Wednesday, April 14, 2010

मझ्या आठवणितले वाढदिवास

लहानपणीच्या मझ्या आठवणीतले वाढदिवास म्हण्जे आईने केलेला माझ्या आवडीचा गोड पदार्थ [पुरणपोळी], आणलेला नवा ड्रेस, मैत्रिणींचे नातेवाईकांचे फोन, सध्याकाळी मैत्रिणीनी केलेला गलका.

माझा वाढदिवस ३१ मार्चचा . क्लोझिग मुळे आई बाँकेतुन घरी उशिरा येणार. मी आईची वाट बघत बसायची. आई घरी आली की गडी खुश.

माझी शाळा घरापासुन ५ मि. वर. आम्ही शाळेत वाढ्दिवस साजरा करायचो. शाळेत नवा ड्रेस घालुन जायच, वर्गातल्या सगळ्या मुलांना chocolate वाटायची, मग सगळे एका सुरात म्ह्णायचे HAPPY BIRTHDAY TO YOU.

नंतर जशी मी मोठी होत गेले तसे माझे सगळे वाढदिवस परिक्षेच्या सावलीत झोकाळुन गेले. ३१ मार्च. Oral, writing exams, practicals. माझ्या वाढदिवसाला हमखास परिक्षा असायची.

अशा कितितरी आठवणी. मला मैत्रिणींनी, बहिण अमलाने दिलेली surprise party. Office मध्ये कापलेले केक.

साल २००८. माझ नुकतच लग्न ठरल होत. मी मुंबईची, अभी पुण्याला स्थाइक. माझ्या वाढदिवसा निमित्त अभी खास काम काढुन मुंबईला आला. आम्ही वरळी सी फेस वर फिरायला गेलो. मला मिळालेला पहिला लाल गुलाब. प्यायलेला मिल्क शेक. वरळी सी फेस जिन्यावर मारलेल्या गप्पा. पाहिलेली स्वप्न. अस वाटत होत की दिवस कधी संपुच नये. सार कस स्वप्नवत आणि अविस्मरणीय.

नंतर माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या मुलीचा जन्म. मुलीच्या जन्मा नंतरची ३१ मार्चची सकाळ आणि माझ्या पिल्लुने मला दिलेली गोड smile.

आपण किती मोठे झालो तरी आपला वाढदिवस हा आपल्यासाठी एक स्पेशल दिवस असतो. रोजच्या पेक्षा वेगळा असावा असे तर वाटतेच. कोणी कबुल करो वा न करो , त्या महिन्याच्या १ तारखे पासुनच तो आपल्या मनात रेंगाळत असतो. या वर्षी मनात रेंगाळलेल्या ह्या आठवणी.

No comments:

Post a Comment